भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

‘अल्पवयीनांना छातीला स्पर्श करणं लैंगिक अत्याचार नाही’, नागपूर खंडपीठाचा निर्णय

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नागपूर (वृत्तसेवा) :  लैंगिक अत्याचारासाठी शरीराचा स्कीन-टू-स्कीन म्हणजेच शरीराला किंवा लैंगिक अवयवांना प्रत्यक्ष थेट स्पर्श होणे आवश्यक आहे. शरीराला हाताने चाचपडणे, चाळे करणे किंवा बाहेरून केला गेलेला स्पर्श लैंगिक अत्याचारात मोडता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. लहान मुलांच्या छातीला बाहेरुन हात लावणे हा लैंगिक अत्याचार होऊ शकत नाही.

एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपीनं त्याच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. त्या खटल्याची सुनावणी करताना नागपूर खंडपीठानं हा निकाल दिला. न्या. पुष्पा गणेडीवाला यांच्या एक सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या POCSO कायद्यामधील तरतुदींकडं या सुनावणीच्या दरम्यान न्या.गणेडीवाला यांनी लक्ष वेधले. या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या व्याख्येनुसार, ‘आरोपीनं लैंगिक अत्याचाराच्या हेतूनं मुलांच्या नाजूक अवयवांना स्पर्श करणे आवश्यक आहे.’ या प्रकरणात आरोपीनं पीडित मुलीचा टॉप काढला किंवा तिची छाती दाबलेली नाही. त्यांच्यामध्ये कोणताही प्रत्यक्ष संपर्क झालेला नाही. लैंगिक अत्याचारातील गुन्ह्याचं गांभीर्यानुसार या कायद्यामध्ये किमान तीन वर्ष आणि कमाल पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकारचे गंभीर आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता आहे, याकडे न्यायमुर्तींनी लक्ष वेधले.

“बारा वर्षांपेक्षा लहान मुलींचा टॉप काढणे किंवा तिची छाती दाबणे यासारख्या नेमक्या माहितीशिवाय या प्रकरणातील गुन्ह्यांना लैंगिक म्हणता येणार नाही. हे गुन्हे लैंगिक अत्याचाराता मोडत नाही. आरोपीची अन्य प्रकारची कृती म्हणजे महिलांच्या शालिनतेला धक्का पोहचवणारा हा गुन्हा असून हे गुन्हे भारतीय दंड विधानाच्या (IPC) कलम 354 अंतर्गत येतात.’, असं या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीची छाती दाबणे आणि तिला अर्धनग्न करण्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपीनं दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपीनं पीडित मुलीला पेरु देण्याच्या निमित्तानं घरी नेले होते. पीडित मुलीची आई घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांना मुलगी रडताना दिसली. त्यानंतर या आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!