भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगरव्हिडिओ

Video;जुगार अड्डयांवर मोठी कारवाई, 35 लाखाचा मुद्देमाल जप्त, 51जण ताब्यात !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (अक्षय काठोके )। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा परिसरातील हॉटेल राजेंच्या वरील हॉल मधील अवैध धंद्याच्या जुगार अड्ड्यावर काल रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक आर्चित चांडक व पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 51 जणांना ताब्यात घेतले असून 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबतचा व्हिडिओ वृतांत…

जळगाव जिल्ह्यातील विदर्भ खान्देश सीमेलगत असलेल्या कुऱ्हा- काकोडा नजीक धुपेश्वर मार्गावरील पिंपळा फाट्यावर होटेल राजेंच्या वरील हॉल मध्ये एका अवैध धंद्याच्या  जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून यात 6 महागड्या सहा चाकी सह दहा मोटरसायकली, 51 मोबाईल व 2 लाख 60 हजार रोख असा 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी 51 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास टाकलेल्या या धाडी मध्ये भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या पथकाने ही कारवाई केली असून ,मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहेत. कुऱ्हा- काकोडा हा परिसर विदर्भ खानदेशच्या सीमेवर व सातपुडा वन क्षेत्रात असल्याने या ठिकाणी नाग मनी , जुगार ,सट्टा असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बळावले असून याकडे स्थानिक पोलिस हे कायम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून वारंवार केला जातो . मात्र या घटनेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई समोर आल्याने पोलिसांचा हा वचक असाच राहील की पुन्हा थातुर मातुर कारवाही करून पुन्हा अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जुगार अड्डयातून लाखोंची उलाढाल
तालुक्यात जुगार अड्डे सुरू असल्याचे या कारवाईवरून समोर आले असून एकाच वेळी ५१ जुगारी आढळून आल्याने जुगार अड्डयाचे स्वरूप लक्षात येते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून आणखी काही ठिकाणी जुगार अड्डे असल्याचा चर्चा मात्र रंगत आहे त्यामुळे ठीक ठिकाणी धाड सत्र राबवून ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच परिसरात ठिक-ठिकाणी अवैध दारूची विक्री खुलेआम सुरू असल्याची पहावयास मिळते या दारू पिणाऱ्यांमुळे व्यसनाधिनांचे प्रमाण वाढत असून वादाचे प्रकार पाहायला मिळतात याकडे लक्ष देऊन सट्टा-जुगाराचे अड्डे व अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी सर्व थरांतून केली जात आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!