प्रेम;धोका..व्यावसायिकांची डोकं छाटून शरीराचे केले तुकडे; अत्यंत क्रूरपणे हत्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका व्यावसायिकाला प्रेमात खूप मोठा फटका सहन करावा लागला. त्याचं एका तरुणीवर प्रेम होतं. मात्र त्यानंतर असं काही झालं की ऐकून तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल. प्रेम आणि धोक्याच्या या कथेचा शेवट अत्यंत त्रासदायक झाला. याची सुरुवात वादातून होते आणि त्यानंतर चाकूने वार आणि हत्या होते. इतकच नाही हत्या केल्यानंतर व्यावसायिकाचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरुन राजधानी एक्सप्रेसमधून गोव्याच्या रस्त्याने भरुचमध्ये फेकून दिला जातो.
46 वर्षीय व्यावसायिक नीरज गुप्ता यांचं फैजल (29) नावाच्या तरुणीसोबत तब्बल 10 वर्षांपासून जवळचे संबंध होते. विवाहित असलेले नीरज यांना फैजलशी लग्न करायचं होतं. यादरम्यान फैजलचा मोहम्मद जुबैर (28) नावाच्या तरुणाशी साखरपुडा झाला. मात्र नीरज फैजलला हा साखरपूडा करण्यापासून थांबवित होता.
उत्तर पश्चिम दिल्ली मॉडल टाऊनमध्ये राहणारे नीरज हे फैजलच्या घरी गेला होता व येथेच त्यांची हत्या करण्यात आली. नीरज घरी पोहोचला नसल्याने त्याच्या एका मित्राने 14 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. तपासात नीरजच्या लोकेशनचा पत्ता लागला मात्र तो सापडत नव्हता. दरम्यान नीरजच्या पत्नीने फैजलविरोधात गुन्हा दाखल केला. नीरजच्या पत्नीने सांगितलं की, नीरजचं फैजलसोबत गेल्या अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. यावेळी जेव्हा पोलिसांनी फैजलची चौकशी केली तेव्हा तिने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मात्र पोलिसांनी आपल्या पद्धतीने तिची चौकशी करताच तिने सर्व खरं सांगितलं. ती म्हणाली की, ती नीरजच्या करोल बाग कार्यालयात काम करीत होती आणि तिचं नीरजसोबत गेल्या 10 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते.
फैजल नीरजच्या कार्यालयात काम करीत होती. दोघांमध्ये 10 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. विवाहित नीरज याला फैजलशी लग्न करायचे होते. दरम्यान फैजलने कुटुंबाच्या दबावापोटी जुबैरसोबत साखरपूडा केला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा फैजलने नीरजला याबाबत सांगितलं त्यावेळी त्यांनी फैजलच्या कुटुंबीयांना तिचं जुबैरशी लग्न लावण्यापासून रोखलं. घटनेच्या दिवशी 13 नोव्हेंबरच्या रात्री नीरज हे फैजलच्या आदर्श नगर येथील भाड्याच्या घरात पोहोचले. येथे नीरज आणि तीन आरोपींमध्ये मोठा वाद झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या दिवशी नीरजची त्या तीन आरोपींसोबत मोठा वाद झाला. यामध्ये जुबैरने नीरजच्या डोक्यावर लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. यानंतर त्याने नीरजच्या पोटात तीनवेळा चाकूने भोसकलं. त्यानंतर त्याचा गळा कापला. यानंतर तिघांनी नीरजचा मृतदेह ठिकाणी लावण्याचा प्लान तयार केला. त्यांनी नीरजच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन एका सुटकेसमध्ये भरले. त्यानंतर अॅप बेस्ड टॅक्सी करीत सुटकेस घेऊन निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचले. रेल्वेच्या पँट्रीमध्ये काम करणारा जुबैर गोव्या जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये चढला आणि रस्त्यात भरूनच्या जवळ मृतदेह फेकून दिला. उत्तर पश्चिम दिल्लीचे डीसीपी विजयंत आर्य यांनी सांगितलं की, या प्रकरणात जुबैर, फैजल आणि तिची आई शाहीन नाज (45) यांना अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडाचा रॉड आणि चाकूही सापडला आहे. नीरजच्या मृतदेहाचा शोध घेण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.