भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमराष्ट्रीय

धक्कादायक; ११ वर्षीय मुलाने १० वर्षांच्या मुलीची ऑनलाइन गेममध्ये हरवलं म्हणून केली हत्या !

इंदूर (वृत्तसंस्था)। मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. तेव्हापासून शाळा-महाविद्यालये बंद आहे. परिणामी मुलं घरात असून सतत मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र या ऑनलाइन गेममुळे कोणाचा खून होऊ शकतो, असा विचार कधी केला आहे? मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये असा प्रकार घडला. इथं एका ११ वर्षीय मुलानं एका १० वर्षीय मुलीची हत्या केली. याचं कारण ठरलं गेम.

वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, मुलाला संशय होता की, या मुलीने त्याच्या एका उंदीराची हत्या केली आहे. यावरून मुलाला खूप राग आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी पाचवीत शिकणारी होती. डीआयजीने सांगितले की मुलाने केलेल्या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलाने पोलिसांना सांगितले की उंदीरावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. १० वर्षीय मुलीच्या आई-वडिलांनी असा आरोप केला आहे की, त्यांची मुलगी या अल्पवयीन मुलाला ऑनलाइन गेममध्ये सतत हरवत होती. या रागातून ११ वर्षीय मुलानं या मुलीचं डोकं दगडानं ठेचलं. यात १० वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण इंदूर शहर हादरून गेलं आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून. त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!