भयंकर ! सख्या भावानेच मित्राच्या मदतीने डोक्यात हत्याराने वार करून केला बहिणीचा खून
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यातील बोरगाव येथे मनाला हलवून टाकणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच मित्राच्या मदतीने आपल्या सख्या बहिणीचा खून केला असल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान केज पोलिसांनी मयताचा भाऊ व त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,केज तालुक्यातील बोरगाव बु.येथे आठ दिवसापूर्वी पुणे येथून पाडव्यानिमित्त आईला माहेरी भेटायला आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने खून केल्याची खळबळ जनक घटना मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी केज पोलिसात भावासह त्याच्या मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथून आईला केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला पाडव्याच्या सना निमित्त शितल लक्ष्मण चौधरी वय २८ वर्ष ही तिच्या लहान मुलीला घेऊन बोरगाव येथे गावी आली होती मंगळवारी मध्यरात्री तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा.बोरगाव यांनी अज्ञात कारणावरून बहिणीच्या डोक्यात ,कपाळावर हत्याराने वार करून तिचा खून केला या प्रकरणी मयताच्या चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे यांने दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा.बोरगाव यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.