भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

धक्कादायक : प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत पेटवले

Monday To Monday NewsNetwork|

नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला प्रियकराने पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. १०) दुपारी एकच्या सुमारास पंचवटीतील शिंदेनगरात प्रेमप्रकरणातून वाद झाल्याने हा प्रकार घडला. पीडित महिलेच्या मोठ्या बहिणीच्या घरात घटना घडली.

याबाबत पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित रिक्षाचालक सुखदेव गुलाब माच्छेवाल ऊर्फ कुमावत (५९, रा. कुमावतनगर) याच्यासोबत पीडित महिला (५८, रा. शिंदेनगर, पंचवटी) या महिलेची ओळख झाली. अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय असल्याने नेहमी कुमावतच्या रिक्षामधून पीडिता प्रवास करत असल्याने त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. मंगळवारी दुपारी ती शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या मोठ्या बहिणीकडे (६१, रा. शिंदेनगर) गेली असता संशयित तेथे आला. त्याच्या हातात पेट्रोल भरलेल्या दोन बाटल्या होत्या. ‘तुझ्याशी बोलायचे आहे, खाली चल’ असे तो म्हणाला. त्यास नकार दिल्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत मारहाण केली. बाटलीतील पेट्रोल अंगावर टाकले.

यावेळी दुसऱ्या बाटलीतील पेट्रोल घरात पडले. खिशातून आगपेटी काढून आग लावून तो पळून गेला. यामध्ये पीडिता गंभीर भाजली. तिला वाचविताना मोठ्या बहिणीचे हात-पाय भाजले. हॉलमध्ये आग पसरल्यानंतर मोठ्या बहिणीचे वृद्ध सासरे आणि दोन नातू आगीपासून बचाव करण्यासाठी बेडरूममध्ये ले एव तेथील खिडकीतून आरडाओरड करत मदत मागितली. इमारतीमधील रहिवाशांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. काही वेळातच अग्निशमन बंबही दाखल झाले. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत फ्लॅटमध्ये अडकून पडलेल्या वृद्ध आणि दोन लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.

गंभीर भाजलेली पीडिता व तिच्या बहिणीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्या मोठ्या बहिणीचे हात-पाय भाजल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस दाखल झाले. मुलांकडून माहिती घेऊन संशयिताचा माग काढला. त्याला दिंडोरी येथील लखमापूर फाटा येथे अटक केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!