भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

लाचखोर उपविभागीय वन अधिकारी लाच स्वीकारतांना एलसीबीच्या जाळ्यात !

Monday To Monday NewsNetwork

अहमदनगर, प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील उपविभागीय वन अधिकाऱ्याला आळेफाटा (ता. जुन्नर) चौकात ४० हजारांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. विशाल किसन बोराडे (वय ४० ) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून मूळचा आंबेगाव तालुक्यातील रहिवाशी आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आळेफाटा येथील तक्रारदार याचा मावसभाऊ यांची संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील पुर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरण झाले असले बाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहवाल पाठविणे करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे ४० हजारांची मागणी केली होती.

तक्रादाराने दोन दिवसापूर्वी नाशिक दौऱ्यावर असलेल्या वनराज्यमंत्री दत्तामामा भरणे याना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ अभिप्राय देणाच्या सूचना केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्याने लाचेची मागणी कायम ठेवल्याने तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्या नंतर आरोपी लोकसेवक विशाल बोराडे यांनी तक्रारदार यांचेकडे आपल्या मूळगावी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे आळेफाटा चौकात लावलेल्या सापळ्यात पंचासमक्ष ४० हजार रुपये स्विकरली असता त्यांना रंगेहाथ पकडले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!