क्राईमनाशिक

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर तरुणांचा खून : भर रस्त्यात चाकूहल्ला !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक, प्रतिनिधी : पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच किरकोळ कारणातून भर रस्त्यात एकाचा चाकूने भोसकून खून झाल्याने नाशकात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील दूध बाजारात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच हा खून झाल्याने नाशकात गुन्हेगार किती बेभान झाले आहेत, हे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर असे, नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दूध बाजार पोलीस चौकीजवळ दोन तरुण नशा करत होते. त्यावेळी दोघात किरकोळ कारणातून वाद झाला आणि त्यात एकाने दुसऱ्याच्या पोटात खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला व संशयित पसार झाला. नागरिकांनी जखमी व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. संशयित आरोपी आणि मयत हे दोघेही फिरस्ते असल्याची माहिती आहे.

सदरील घटना भर रस्त्यात झाल्याने नाशकात एकच खळबळ उडाली आहे. नितीन उर्फ सोनू गायकवाड असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी अद्यापही फरार असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहेत. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच हा खून झाल्याने नाशकात गुन्हेगारी फोफावल्याची चर्चा रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!