सात हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात !
Monday To Monday NewsNetwork|
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शेतजमिनीवरील पीक कर्जाच्या बोजाची 7/12 वर नोंद लावून घेण्यासाठी मालेगाव तालुक्यातील वनपट येथील तलाठ्याला ७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून यामुळे परिसरात हादरे बसले आहे.
सविस्तर माहिती अशी, कॅनरा बँकेतून तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवर पीक कर्ज मंजूर झाले होते. या पीक कर्जाचा बोजा 7/12 उतार्यावर नोंद लावून घेण्यासाठी वनपटचे तलाठी अशोक वायाळ याने ७ हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी पंचसाक्षीदार यांच्या समक्ष मालेगाव तालुक्यातील दहीदी तलाठी कार्यालयात लाच स्वीकारत असताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.