बोरघाट खून प्रकरणाचा सावदा पोलिसांनी १३ तासात लावला छडा; दोघांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा (प्रतिनिधि)। सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सातपुडा पायथ्यातील पाल जवळील घनदाट बोरघाटात दि १ रोजी सकाळी वरणगाव येथील चांगो रामदास झोपे , यांचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली ,सदर प्रकरणी सावदा पोलिसांनी वरिष्ठांच्या सहकार्याने आपली तपासचक्रे गतीने फिरवीत मयत इसमाचे घराजवळील दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी या खुनाची कबुली दिली आहे अवघ्या १३ तासात पोलिसांनी या खुनाचा छडा लावण्यात यश आले आहे ,
चांगो झोपे हे मयत इसम दि २९ जानेवारी पासून आपले राहते घर वरणगाव येथून बेपत्ता होते या बाबत दि ३० रोजी वरणगाव पो.स्टे.ला मिसिंग दाखल करण्यात आली होती,मयताच्या नातेवाईकांनी माहिती देणाऱ्यास रु,५१०००/-बक्षीस सुद्दा ठेवले होते, पोलीस त्यांचा तपास करीत असता तपासा दरम्यान त्यांचे मोबाईल लोकेशन देखील मिळाले ते देखील महाराष्ट्र व मध्यप्रदेश दरम्यान मिळत होते, अश्यातच त्यांचा मृतदेह दि १ रोजी पाल घाटात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली, तपासाचे आवाहन समोर असतांना सावदा पोलिसांनी वरणगाव येथील पोलीस तसेच पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले, सावदा येथील स.पो,नि देविदास इंगोले, वरणगाव स.पो.नि. संदीप बोरसे, सावदा पी.एस.आय. राजेंद्र पवार व सहकारी यांनी एकत्रित तपासास सुरवात केली, वरणगाव येथील सी.सी. टी.व्ही.फुटेज मध्ये एक संशयित चांगो झोपे यांना गुरांचे बाजार जवळ मोटार सायकल ने सोडताना दिसून आला तोच धागा पकडून पोलिसांनी तपासास सुरवात केली, व दोन संशयित शेख जाबीर शेख कादीर ,वय ३२ व शेख जावेद शेख खलील, वय ३२ दोघे राहणार वरणगाव यांना तपास कामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल करीत सदर खून केल्याचे सांगितले ,
दोघे संशयित यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी या खुना बाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली यात त्यांनी सदर मयत चांगो झोपे यांचे घरी आरोपी यांचे येणे – जाणे होते दरम्यान काही दिवसा पूर्वी त्यांचे घरातून काही पैसे चोरीस गेले होते याचा संशय त्यांनी सदर आरोपी यांचेवर होता, दरम्यान त्यांचा मुलगा बाहेर गावी गेल्याचे साधून आरोपी यांनी झोपे यांना विश्वासात घेऊन गेलेले पैसे परत देतो असे सांगून बरोबर नेले, नंतर त्यांनी त्यांना एका मित्राचे स्विफ्ट कार मध्ये नेऊन सावदा स्टेशन, मस्कावद इत्यादी मार्गे पाल घाटा कडे नेले व त्यांचा खून केला, अशी कबुली दिली, खून केल्यावर घटना स्थळी मयत यांचे हातातील ३ सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची कासवाच्या आकाराची अंगठी, गळ्यातील २० ग्रेम वजनाचे सोन्याचे लॉकेट, दोन सोन्याचे बसवलेले दात, असा एकूण १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज दिसून आलेला नाही तर मयत यांचे शेजारी अंगातील स्वेटर, तुटलेला चष्मा, पायातील चप्पल, मनगटी घडयाळ, पेन अश्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेला आढळून आला, या बाबत सावदा पो,स्टे, ला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हया गुन्ह्या मागील आरोपीना पकडण्यात यश मिळविले यावेळी त्यांचे सोबत संपूर्ण सावदा पोलीस स्टेशन ची टीम होती,सादर सर्व टीम व सावदा सपोनि देविदास इंगोले,पीएसआय राजेंद्र पवार याना खुनाचा छडा लावण्यात यश आले आहे.