भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड, तब्बल २११ तरुण-तरुणी ताब्यात

नवी मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेले बार, पब्ज आता नियम अटींसह सुरू झाले आहे. पण, नवी मुंबई  सरकारी नियम पायदळी तुडवत बेफामपणे पब्ज आणि बार सुरू असल्याचे समोर आले. नवी मुंबई पोलिसांनी एका बारवर धाड टाकली असून अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. यात तब्बल २११ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.

नवी मुंबई गुन्हे शाखेनं शनिवारी रात्री ही कारवाई केली आहे. शहरातील कॅफे पाम अटलांटिस या बारवर ही कारवाई करण्यात आली. कॅफे पाम अटलांटिस बारमध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू होता. शनिवारीचा सुट्टी दिवस असल्यामुळे बारमध्ये हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या बारवर छापा टाकला. तेव्हा गर्दी पाहून पोलीसही हैराण झाले. या बारमध्ये जंगी हुक्का पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये तब्बल २११ तरुण, तरुणींचा समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. २११ तरुण-तरुणींना बार बाहेर काढताना पोलिसांची एकच दमछाक झाली होती. एकीकडे कोरोनाच्या परिस्थितीमुळे नियम अटींसह बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बारमध्ये ५० टक्के ग्राहकांच्या क्षमतेसह परवानगी दिली आहे. पण, नवी मुंबईत सर्वच नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!