थरारक घटना! भर चौकात विवाहित प्रियसीला जिवंत जाळत प्रेमसंबंधाचा शेवट
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नागपूर (वृत्तसंस्था)। शहरातील सदर पोलीस स्टेशन हद्दीत एका विवाहित महिलेनं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी पेटवून घेण्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर चौकात घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेने स्वतःचे प्रेम प्रकरण लपवण्यासाठी पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याचे मृत्यूपूर्वी महिलेनं जबाबात म्हटलं आहे. पण प्रत्यक्षात पोलीस तपासात जे पुढे आल ते चक्रावून टाकणारे होते. शहरातील महेंद्रनगर भागात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. शबाना अब्दुल जावेद (वय 40 ) असं या महिलेचं नाव आहे. शबानाही विवाहित होती. तीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध लपवण्यातून ही घटना घडल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
शबानाचे अर्ध्या वयाच्या युवकाशी प्रेम संबंध होते. तिने या तरुणाकडे लग्नासाठी तगादा लावला होता. पण, या तरुणाने तिला लग्नास नकार दिला होता. शुक्रवारी दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर शबानाने पेटवून घेतल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी तातडीने या शबानाला रुग्णालयात दाखल केले होते. पण, गंभीर भाजल्यामुळे तिचा मृत्यू झाला. पण या घटनेत महिलेनं स्वत: पेटवून घेतले की जाळले, हे मात्र अजून तपासातून अद्याप पुढे आले नाही. पोलीस तपास करत आहे.