आर्यन खान प्रकरणात मनीष भांगळेची एन्ट्री : हॅकींगसाठी ५ लाखांची ऑफरचा खळबळजनक दावा
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर काही लोकं मनीष भांगळेला जळगावमध्ये जाऊन भेटले. या लोकांनी मनीष भांगळेला ५ लाखांची ऑफर देऊन १० हजार रुपये रोख दिले आहेत. काही कॉल रेकॉर्ड काढण्यासही मनीष भांगळेला सांगण्यात आले होते. आर्यन खानच्या प्रकरणात प्रभाकर साईल नंतर मनीष भांगळेच्या एन्ट्रीमुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात आता हॅकेर मनिष भंगाळेने एन्ट्री मारली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगेळे वळण मिळताना दिसत आहेत. या प्रकरणी पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी आपल्याला पाच लाखांची ऑफर आली, असा खळबळजनक दावा मनिष भंगाळेने केला आहे.
मनीष भांगळेने एक निवेदन जारी करत आपली बाजू मांडली आहे. मनीष भांगळेने आपल्या पत्रात म्हटलं आहे की, दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी २ व्यक्ती आले होते. त्यांचे नाव अलोक जैन आणि शैलेश चौधरी असून ते मला रात्री १०:३० वाजता जळगाव येथील पिंप्राळा ब्रिज वर भेटले. “मी त्यांच्या सोबत जळगाव ते पाळधी गेलो त्यांना माझ्याकडे महत्वाचे काम असल्याचे सांगितले. तुम्ही भारत मध्ये एक प्रसिद्ध हॅकर आहे. तुमच्यासाठी खूप किरकोळ पण आमच्यासाठी खूप मोठ काम आहे असे त्यांनी मला सांगितलं. मी काय काम आहे ते विचारता त्यांनी मला सांगितलं कि आम्हाला काही नंबरचे सिडीआर पाहिजेत. त्याच्यात पूजा दादलानी नावा नि सेव असलेला नंबर धाखवला आणि अनेक नंबर होते” असे मनीष भांगळेने म्हटलं आहे. दरम्यान मनीष भांगळेने पुढे म्हटलं आहे की, पुढे त्यांनी मला व्हाट्सअॅपची चॅट बॅकअप फाईल दाखवली त्याच्यात त्यांनी मला काही गोष्टी एडिट करून दया आसे सांगितलं. ते जे व्हॉट’सअॅप चॅट बॅकअप होता ते आर्यन खान चॅट आसा नावानी सेव होत.
त्या नंतर त्यांनी मला प्रभाकर साईल या नावच डमी सिम कार्ड काढून दया आसे सांगितलं. आणि हया सर्व कामासाठी त्यांनी मला ५ लाख रुपयांची ऑफर दिली आणि १०००० रोख दिले. मला असे काम करायचे नव्हते त्यासाठी मी हो ला हो लावून तिथून निघून गेलो. जातांना त्यांनी मला एक मोबाइल नंबर दिला आणि सांगितलं कि हया नंबर वर सकाळी कॉल करा तुमच्यासाठी मुंबईला भरपूर मोठे मोठे काम आहे आणि भारताचे काही मोठे अधिकारी व नेता पण आमच्या सोबत आहेत. तुम्हाला याचा खूप फायदा होईल ह्या सर्व गोष्टी घडल्या नंतर मी प्रभाकर साईलला टीव्ही वर पहिले मग मी अस्वस्थ झालो आणि मला शंका आहे की त्यांनी प्रभाकर साईलचा नावाने बोगस सिम घेतला असेल आणि त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे तसंच आर्यन खानचे व्हाट्सअॅप चॅटमध्ये पण काही मॉडिफिकेशन होऊ शकतात म्हणून माझी विनंती आहे की आपण याचा वर लक्ष्य देऊन कार्यवाही करावी, अशा आशयाचे पत्र मनीष भांगळेने मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिले आहे.