क्राईमबुलढाणा

चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार, शिक्षक फरार

बुलढाणा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बदलापूर, कोल्हापूर,कळवा, अकोला, सिन्नर अशा अनेक ठिकाणी विशेष म्हणजे लहान अजाण मुलींना वासनेची शिकार केलं जात आहे. त्या अनेक घटना या शिक्षकांनीच अल्पवयीन विद्यार्थिनीवर केल्याचं उघड झाले आहे आता त्यातच बुलढाणा जिल्ह्यातून आणखी एक नवीन घटना समोर आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हापरिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर शिक्षकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. घटनेत खुशालराव शेषराव उगले या ५६ वर्षीय शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना माता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यात घडली. या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात घडलेल्या या घटना ताज्या असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना पुढे आली आहे. खुशालराव शेषराव उगले या शिक्षकाने चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात घडलेल्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्या नराधम शिक्षकाविरोधात किनगावराजा पोलीस स्टेशनला पोस्को व अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसाचं एक पथक रवाना करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!