जि. प. शाळा गाते येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जि प शाळा गाते ता रावेर जि जळगाव येथे नुकताच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त सरपंच सौ सारिका गणेश पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश प्रकाश तायडे हे होते.
कार्यक्रमाला सरपंच सारिका गणेश पाटील, सुनिता तायडे, अलका तायडे, पूनम पंकज पाटील, सदाशिव झांबरे, विलास चौधरी, रिता तायडे, लता भालेराव, उषाबाई खैरे, प्रदिप बार्हे, सर्व ग्रा प सदस्य उपस्थित होते. पो पा मनिषा वाघ
तसेच व्यवस्थापन अध्यक्ष योगेश कोळी, राजकन्या तायडे, रूपाली पवार, वैशाली ढिवरे, जगदीश कोळी, दिपाली कोळी, सुनीता कोळी, मिलिंद तायडे, कन्हैया पाटील, देवानंद वाघरी,किशोर तायडे,सरिता जीवन कोळी, संतोष कोळी आदी मान्यवर उपस्थित होते..

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या गीताने झाली यावेळी पारंपरिक नृत्य देशभक्तीपर गीते सर्व समभाव एकता नाटिका लोकगीते भावगीते सारे शिकूया सारे लिहूया या गीतातून लोकार्थ जनजागृती झाली पाहिजे अशा प्रकारे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी गावातील मोठ्या संख्येने पालक वर्ग ग्रामस्थ महिला तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेद्वारे समाजामध्ये एकता कशी टिकून राहावी सर्व धर्म समभाव याचे उदाहरण दर्शविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्रीमती विद्या रवींद्र चौधरी, राजेंद्र बाजीराव तायडे. माधुरी विजय चौधरी, पंकज जिजाबराव पाटील, अश्विनी तायडे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला योगेश सोनवणे, बंटी कोळी, आकाश वाघरी, प्रतिभा आनंदा तायडे, आदींचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक कार्यक्रम प्रोत्साहन पर विद्यार्थांना ८०००/- रू रक्कम दात्यांनी बक्षीस म्हणून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी विजय चौधरी मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचा शेवट पंकज पाटील सर यांनी आभार प्रदर्शन करून करण्यात आले