मुख्यमंत्री पदा बाबतची उत्सुकता शिगेला, कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रासाठी पुढील काही तास अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या २४ तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे. भाजपचे पक्षनिरीक्षक मुंबईत येणार असून आमदारांशी चर्चा करुन मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे.
उद्या दुपार पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा
जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीतून अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे पक्षनिरीक्षक म्हणून महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. पक्षनिरीक्षक भाजप आमदारांशी वैयक्तिक चर्चा करतील त्यानंतर एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. म्हणून बुधवारचा दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, राज्यात महायुतीने बहुमत मिळवत तब्बल २३० जागा मिळविल्या. त्यात भाजपने सर्वात जास्त १३२ जागा मिळविल्या.मात्र
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता राज्याच्या जनतेला होती. बहुमत मिळवूनही ही उत्सुकता दहा दिवस कायम राहिली. पोसरंतू. आता किमान अकराव्या दिवशी महाराष्ट्राला पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे कळणार आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान कोण होणार या कडे राज्याचे लक्ष लागून आहे.