महाराष्ट्रराजकीय

उत्सुकता शिगेला, निकालांना उरले फक्त काही तास, मतमोजणी साठी देशभरात यंत्रणा सज्ज

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणूक मतमोजणी साठी यंत्रणा सज्ज झाली असून राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर ऐकून १४ हजार ५०७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तर ३ हजार ३७७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राखीव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ऐकून २८९ हॉल मध्ये मतमोजणी होणार आहे.
२८९ हॉल मध्ये ४ हजार ३०९ मतमोजणीच्या टेबल ची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी माहिती दिली.तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

देशात सात टप्प्यात तर राज्यात पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया झाली. १९ एप्रिल रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा झाला. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या पाच टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात मतदान झाले. त्यानंतर सहावा टप्पा २५ मे रोजी तर शेवटचा टप्पा १ जून रोजी झाला   

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!