भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

आत्ताची बातमी : पुन्हा भीषण अपघात ; दोन वेगवेगळ्या अपघातात एकाच वेळात दोन जण जागीच  ठार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील मितवा हॉटेलजवळ सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार विलास रामसिंग भिल वय ४० रा. ममुराबाद ता.जि.जळगाव हा तरूण जागीच ठार झाल्याची घटना गुरूवार १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. तर जळगाव शहरातील शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने भारमल कौतिक पाटील (वय ६५, रा. वैजनाथ ता. एरंडोल) या दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

या बाबत सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात विलास भील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून ऊस तोडण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असता गुरूवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विलास हा दुचाकी (एमएच १० एआय ०३८१) ने जळगाव शहरातून ममुराबाद येथे घरी येत असतांना ममुराबाद रस्त्यावरील हॉटेल मितवा जवळून जात असतांना रोडवर समोरून सिमेंटने भरलेले ट्रॅक्टकर क्रमांक (एमएच १९ पीआय ३३७५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विलास भिल हा जागीच ठार झाला.

जळगाव तालुका पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दुसरी घटना ….
तसेच आजच जळगाव शहरातील शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील खोटे नगरकडून जळगाव शहरात वृद्ध दुचाकीस्वार भारमल कौतिक पाटील (वय ६५, रा. वैजनाथ ता. एरंडोल) हे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बी डब्ल्यू २७३०) ने जळगाव शहरात येत असताना शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार असलेले वृद्ध हे वाहनाच्या अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले. या संदर्भात जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!