भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

“एक झाड तोडा, दोन झाडे जगवा”, ‘केली हिरव्यागार झाडाची कत्तल, आणून ठेवले जुने लाकूड’ सावदा – फैजपूर रस्त्यावरील प्रकार

सावदा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा – फैजपूर रस्त्यावर फार्मसी कॉलेज समोर मेरिडियन प्लाझा समोरील हिरो होंडा शोरुम च्या बाहेरील गेट समोरील कित्येक वर्षांपूर्वीचे मोठे उभे हिरवेगार निंबाचे झाड शुक्रवार दि.१८ एप्रिल रोजी दिवसा ढवळ्या कापण्यात आले. या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या आणि त्या ठिकाणी जुने कोरडे लाकूड आणून टाक्यात येऊन सारवासारव करण्यात आल्याचा प्रकार घडला.

सरकारी झाडे खाजगी व्यक्तीला तोडण्याची परवानगी दिली
सावदा – फैजपूर रोडवर फार्मसी कॉलेज समोरील मेरिडियन प्लाझा समोरील नीम झाड जीर्ण असल्याचे दाखवून कुणालाही अडचणीचे नसताना तोडण्याची परवानगी वन परिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांनी “एक झाड तोडण्याच्या बदल्यात दोन झाडे जगविण्याचे”  सांगून परवानगी दिली. अशी अजबच परवानगी वन विभागाच्या कुठल्या कायद्यात बसते. अशी परवानगी देण्या मागचे गौड बंगाल काय?

हे झाड कुणाच्याही खाजगी मालकीचे नव्हते. रस्त्याच्या बाजूला असलेले हे सरकारी झाड कुणाच्याही मालकीचे नसतांना झाडाशी दूरपर्यंत संबंध नसलेल्या खाजगी व्यक्तीला तोडण्याची परवानगी वन विभागाने दिलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भल्या मोठ्या झाडाचे सरपण कुणाचे? या बाबत स्व. शो. म. फटांगरे , वन परिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांनी दिलेल्या परवानगीत कुठलाही उल्लेख नाही. त्यात पावसाळ्यात दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याच्या अटीवर झाड तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे झाड तोडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या . सदर झाड तोडीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असता तोडलेल्या हिरव्यागार डोलेदार झाडाची ओले मोठे लाकूड व इतर लहान मोठे सरपण हटवून त्या जागी कोरडे जीर्ण झालेले लाकूड आणून टाकण्यात आले. जुने जीर्ण लाकूड घटनास्थळी टाकून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जीर्ण झाड नसताना हिरवेगार मोठे डोलेदार झाड असताना कुठलेही ठोस कारण नसताना या झाडाला तोडण्याला वन विभागाने परवानगी कशी दिली. या बाबत चौकशी करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली असून फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना निवेदनही देण्यात आले आहे.

या बाबत हिरो होंडा शोरुम चे मालक यांनी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली असून त्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे सावदा फैजपूर रोडवर माझे वर्कशॉप समोरील ४० ते ५० वर्षांपूर्वीचे जुने हिरवेगार मोठे झाड माझे वर्कशॉप बंद असताना त्याची कत्तल करण्यात आली. परवानगी मागणाऱ्या व्यक्तीला झाडाचा कोणता त्रास होता. परवानगी कोणत्या आधारावर मागितली आणि कोणत्या आधारावर अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी तक्रार करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!