श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात “सायबर सेक्युरिटी जागरूकता” उपक्रम उत्साहात संपन्न
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या जी. जी. खडसे महाविद्यालय येथील संगणक शास्त्र विभागाने पीएम उषा या महत्त्वकांक्षी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी “कम्प्युटर अवेअरनेस अँड सायबर सेक्युरिटी” प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला.
या अभ्यासक्रमात १०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या अभ्यासक्रमामध्ये डेटा संरक्षण, नेटवर्क सुरक्षा, एथिकल हॅकिंग आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट श्री. आशिष महामुनी यांना बोलावण्यात आले. या अभ्यासक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व अभ्यास साहित्य महाविद्यालयाकडून पुरवण्यात आले.
या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विविध विषय जसे की सायबर अटॅक, सायबर लॉस, गव्हर्नन्स, सायबर सेक्युरिटी, यू पासवर्ड मॅनेजमेंट, क्रिप्टोग्राफी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता व दक्षता निर्माण झाली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या अभ्यासक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाचे कौतुक करण्यात आले.