क्राईममहाराष्ट्र

ब्रेकिंग : “बातम्या अशा देतेय,जसा तुझ्यावरच बलात्कार झालाय”, महिला पत्रकाराला माजी नगराध्यक्षा ची अर्वाच्च भाषा

ठाणे, बदलापूर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बदलापूर मध्ये साडे तीन वर्षीय दोन चीमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला, त्या संदर्भात वृत्त संकलन करणाऱ्या महिला पत्रकाराला “बातम्या अशा देतेय, जसा तुझ्यावरच बलात्कार झालाय” अशी अर्वाच्च भाषा बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला आहे.

बदलापूर येथील दोन चीमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण सध्या राज्यभर नव्हे तर देशात गाजत आहे. त्यातच
बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला केलेल्या या वाक्तव्याचा पत्रकारांनी निषेध केला आहे. “बातम्या अशा देतेय, जसा तुझ्यावरच बलात्कार झालाय” असे घाणेरडे शब्द वापरून वामन म्हात्रे यांनी आपली पातळी सोडून महिला पत्रकाराला अर्वाच्च भाषा वापरली.

दै. सकाळ ची ही महिला पत्रकार गेल्या चार ते पाच दिवसांपासून चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणावर वेळोवेळी बातम्या देण्याचं काम करीत आहे. असे असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला रस्त्यात थांबऊन “बातम्या अशा देतेय, जसा तुझ्यावरच बलात्कार झालाय” असे अत्यंत घाणेरडे शब्द वापरून महिला पत्रकाराची हिनवणुक केली आहे. या प्रकाराचा पत्रकारांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!