यावल मध्ये पोषण आहाराच्या वरणात मृत अळ्या
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल शहरात पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या वरणात आल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील सुतार वाड्यातील शहरी विभागाच्या ७६ क्रमांकाच्या अंगणवाडीतील पोषण आहारात वरणात बारीक पांढऱ्या रंगाच्या अळ्या निघाल्याने पालक संतप्त झाले. पालकांनी अंगणवाडी सेविकेस जाब विचारत या वेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी भुसावळ यांचेकडे तक्रार केली असता बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी अंगणवाडीस भेट देत पंचनामा केला.
यावल येथील सुतार वाड्यात असलेल्या ७६ क्रमांकाच्या शहरी अंगणवाडी मधील पोषण आहारांतर्गत देण्यात आलेल्या वरणामध्ये पांढऱ्या अळ्या आढळून आल्याने संतप्त पालकांनी सेविकेस जाब विचारत धारेवर धरले. उत्तर देताना वारंवार सेविका वेगवेगळे नाव सांगत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला. पोषण आहारात अळ्या निघाल्याने लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ अंगणवाडीस भेट देत बालविकास प्रकल्प अधिकारी यांना या घटनेची दखल घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार भुसावळ विभागीय शहरी अंगणवाडीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी भेट देत अंगणवाडीस पुरवलेल्या पोषण आहाराचा पंचनामा केला आहे. अंगणवाडी पोषण आहारा संदर्भात दोन दिवसात कारवाई न केल्यास पालकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा पालक व नागरिकांकडून देण्यात आला आहे.