Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात, “या” तारखे पर्यंत मिळणार पुढचे दोन हप्ते
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. यानंतर आता सरकारने चौथ्या हप्त्याची घोषणा केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यसरकार कडून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे दोन हप्ते एकूण ३००० रुपये आताच देले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा ३००० रूपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे १५०० रूपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करू नये. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी,भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे.खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून ३००० रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे १० ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. योजना सुरू झाल्या पासून जुलै ये नोव्हेंबर या काळातील एकूण साडे सात हजार रुपये बहिणींना मिळाल्याने बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.