लाडक्या बहिणींना मिळणार एप्रिल – मे महिन्याचा एकत्र हप्ता…
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्र राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे केव्हा मिळणार अशी आशा बहिणींना लागून असताना एप्रिल महिना उलटला तरी अद्याप पैसे मिळालेले नाहीत . आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात आले होते.
एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कधी? महायुती सरकारच्या काळातील सर्वात प्रभावशाली योजना म्हणून लाडकी बहिण योजना ही इतर योजनांपैकी एक असून, योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रूपयांची मदत दिली जाते. मात्र एप्रिल महिना संपूनही लाभार्थींना हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून, मे महिना सुरू झाला आहे. सरकारकडून स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार, मे महिन्यात दोन्ही हप्ते म्हणजे एकूण ३००० रुपये एकत्रच लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे हप्त्याच्या वाटपात विलंब झाल्याचे समजते.
दरम्यान ३० एप्रिलला अक्षय्य तृतीया होती. त्या दिवशी पैसे मिळतील, अशी आशा लाडक्या बहिणींना होती. मात्र, आता अक्षय्य तृतीयेचा मूहूर्त चुकला आहे. मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहेत.