भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपीचा मृत्यू

भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या साडेतीन महिन्यांपूर्वी भुसावळ मध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा खून करण्यात आला. या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी नितीन जगदीश पथरोड. वय २४, रा. वाल्मिक नगर, भुसावळ याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे माहिती मिळत आहे.

भुसावळ शहरातील जुना सातारा रोडवरून कारमधून जात असताना भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा राजेश सूर्यवंशी व बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या जुन्या वादातून काही हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली होती. दि.२९ मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली होती. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती. व काही आरोपी फरार आहेत.

या हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपींना सुरक्षतेच्या कारणास्तव नंदुरबार येथील कारागृहात हलविण्यात आले असून या प्रमुख आरोपी पैकी नितीन पथरोड याची प्रकृती काही दिवसांपासून बिघडल्याने त्याच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रूग्णालयात उपचार सुरू असतांनाच शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!