आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांचा मृत्यू ; वाढदिवसाचे पुढील कार्यक्रम स्थगित
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निमखेडी येथिल समर्थकाचा घरी जात असताना गाडी स्लिप झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून मृतांच्या आईने रुग्णालयात आक्रोश केला आहे. तर वाढदिवसा निमित्त पुढील कार्यक्रम स्थगीत करण्यात आले आहेत.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आज अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. सायंकाळी नाशिक येथील देवमामलेदार ख्यातनाम बँडच्या तालावर हजारो कार्यकर्त्यांनी ताल धरून वाढदिवसाचा आनंद घेत असतांनाच रात्री आठ वाजेच्या सुमारास आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले निमखेडी येथील अरविंद भीमराव लोमटे ( वय ३६ ) यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन घरी परतत असताना मृत्यू झाला. यामुळे कार्यकर्त्यांच्या शोककळा पसरली.
समोर आलेल्या माहिती नुसार गाडी स्लिप झाल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत असून मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले आहे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह सहकार्यांनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली असून मृताच्या आईकडून रुग्णालयात आक्रोश करत घातपाताची शंका व्यक्त केली असून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.