भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

ज्ञानवापीनंतर आता मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी प्रकरणात शाही इदग्याच्या ASI सर्वेक्षणाला मंजुरी !

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या मुद्द्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. एएसआय सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका हिंदू पक्षाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमीला लागून असलेल्या मशिदीच्या सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये 18 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयात गुरुवारी (१४ डिसेंबर) या प्रकरणाची एकत्रित सुनावणी झाली.

सर्वेक्षणाला मान्यता देण्यासोबतच उच्च न्यायालयाने स्पष्ट छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यास सांगितले आहे. मात्र, हे सर्वेक्षण ज्ञानविपाहीपेक्षा थोडे वेगळे असेल. कारण न्यायालयाने तेथे वैज्ञानिक सर्वेक्षण केले होते, जे शाही इदगाह मशिदीत केले जाणार नाही. सर्वेक्षणासाठी अधिवक्ता आयुक्त कोण असतील? सर्वेक्षणासाठी किती दिवस देण्यात येणार? यावर १८ डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचे जन्मस्थान …

या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, त्या मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचे जन्मस्थान आहे आणि मशीद हिंदू मंदिर असल्याचे सिद्ध करणारे अनेक चिन्हे आहेत.याशिवाय मशिदीच्या खाली कमळाच्या आकाराचा स्तंभ आणि हिंदू देवतांपैकी एक ‘शेषनाग’ची प्रतिमा देखील आहे. इतकेच नाही तर मशिदीच्या खांबांच्या खालच्या भागात हिंदू धार्मिक चिन्हे आणि कोरीवकाम असल्याचा दावा करण्यात आला आहे. वकील विष्णू जैन म्हणाले, शाही इदगाह मशिदीमध्ये हिंदू मंदिराची अनेक चिन्हे आहेत आणि वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी ASI सर्वेक्षण आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!