जळगावात शरद पवारांबद्दल बदनामीकारक फोटो : गुन्हा दाखल
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केतकी चितळे यांनी केल्यास नंतर जळगावातही (Jalgaon) फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी करून पोस्टवर अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी अंकित पाटील आणि हरीष कोळी या नावाच्या फेसबुक धारकांविरोधात सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे वर केतकी चितळे यांनी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्या नंतर जळगावातही आक्षेपार्ह फोटो व मजकूर अंकित पाटील आणि हरीष कोळी या नावाच्या फेसबुक धारकांनी टाकली यामुळे शरद पवार यांची बदनामी तसेच शिवाय पोस्टवर अश्लिल शिवीगाळ देखील करण्यात आला आहे.
- “तु मला आवडतेस … ” महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग
- मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी महिला सरपंच अवघ्या पाच दिवसात अपात्र …….
- मुक्ताईनगर मध्ये गावठी कट्टा सापडल्याने खळबळ, तरुणाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सायबर पोलीस ठाण्यात या दोघं फेसबुक धारकांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून अंकित पाटील आणि हरीष कोळी या नावाच्या फेसबुक धारकांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.