भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमराजकीयराष्ट्रीय

ब्रेकिंग : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं केली अटक !

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दोन तास चौकशी झाल्यानंतर ईडीने अरविंद केजरीवाल CM Arvind Kejriwal यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे.

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं आहे. याआधी केजरीवाल यांना ईडीकडून नऊ वेळा समन्स बजावण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते.

अखेर गुरुवारी संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांची चौकशी होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. त्यानंतर हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून केजरीवाल यांनी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावलाय. त्यानंतर ईडीचे पथक त्यांच्या घरी दाखल झालं. मात्र आपने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, . रात्रीच या प्रकरणात सुनावणी व्हावी अशी आपची मागणी आहे. त्यामुळे काय होतं. याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

ईडीच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या कारवाईनंतर आपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे आपकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!