विधानसभा निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा दावा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्राच्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदा बाबत मोठा दावा केला आहे. महायुतीत कुणीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही .बहुमत मिळाल्यानंतरच मुख्यमंत्री ठरणार असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा दावा केला आहे. विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना, आमदारांचे मोठे संख्याबळ असताना भाजपला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानाव लागत आहे.
‘महायुतीत कुणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही? असा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हा दावा केला. ‘बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री ठरणार’ असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलय. अजित पवार यांच्या या दाव्याने महायुतीत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महायुतीतील तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत आधी बहुमत मिलवण्यावर भर देतील आणि त्या नंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल.महायुतीतून मुख्यमंत्री होणार हे मात्र नक्की. मुख्यमंत्री कोणत्या पक्षातून होईल हे निवडणूक निकालानंतर ठरवणार आहे. असेही अजित पवारांनी या वेळी सांगितलं.
२०१९ च्या निवडणुकीत आम्ही ५६ जागा जिंकल्या होत्या तसेच आमच्याकडे ६-७ अपक्ष आमदार सुद्धा आहेत.त्यामुळे यावेळी ६० जागा लढविणार असल्याचा आमचा मानस आहे. असे अजित पवार म्हणाले.