भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

उपजिल्हाधिकाऱ्यांनी मागितली ४१ लाखांची लाच, कारकुनासह ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शेतजमिनीच्या कामासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी ४१ लाखांची मागणी केली होती . २३ लाख रुपये आधीच घेतले होते. ५ लाख घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. आरडीसी महोदयांनी शेतजमिनीच्या कामासाठी ४१ लाखांची मागणी केली होती. त्यातील २३ लाख आधीच घेतले होते. पुन्हा यातील ५ लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. शेतजमिनीच्या वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून २३ लाख रुपये आधीच घेतले होते. त्यानंतर पुन्हा १८ लाखांची मागणी केली होती, त्यापैकी ५ लाख घेताना त्यांना अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत पकडण्यात आले. ACB ने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून  छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!