महावितरणचा उपकार्यकारी अभियंत्याला २० हजारांची लाच घेताना अटक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महावितरण कंपनीच्या नवीन सर्विस कनेक्शनच्या क्षमता वाढसाठी २० हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे वय-४६, रा. भुसावळ याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले . या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केलेल्या उपकार्यकारी अभियंता याचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे भुसावळ शहरातील रहिवासी असून ते शासकीय विद्युत ठेकेदार म्हणून ते काम करतात. त्यांनी एका खाजगी कंपनीचा एलएससीच्या स्कीम अंतर्गत नवीन सर्विस कनेक्शन क्षमता वाढ 100 वॅट वरून 200 वॅट करण्याकरता प्रस्ताव भुसावळ येथील उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्याकडे सादर केला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी उपअभियंता उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान तडजोडी अंती अखेर 20 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदर यांनी जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाला या संदर्भात तक्रार केली. पथकाने बुधवारी 22 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता सापळा रचून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता. प्रशांत प्रभाकर इंगळे,
वय 46 वर्ष , व्यवसाय नोकरी , उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि कंपनी मर्या .भुसावळ ( वर्ग-2) नेमणूक :- उप कार्यकारी अभियंता कार्यालय (चोरवड) भुसावळ , जिल्हा जळगाव यांना 20 हजार रुपये घेताना रागेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.