भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

सामाजिक

Extra Marital Affair of Women :विवाहित महिलांमधील अफेअरच्या प्रमाणात वाढ; सर्वेक्षणातील खुलासा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भारतात बहुधा विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणांमध्ये पुरुषांचं नाव समोर येतं. लग्नानंतरही अनेक पुरुषांचे बाहेरील किंवा इतर स्त्रियांसोबत संबंध असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. मात्र, हीच गोष्ट एखाद्या स्त्रीनं केली तर आजही समाजासाठी हा एक चर्चेचा विषय ठरतो. हा भेदभाव आजही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. व्याभिचार हा विषय भारतात कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या खूपच चर्चिला जाणार विषय आहे. व्याभिचाराच्या बाबतीत भारतातील पुरुषांचे प्रमाण हे कायमच अधिक राहिलं असून, परुषांबाबत अशा घटनांची दबक्या आवाजात चर्चा होत असली तरी त्यावर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झालेला पहायला मिळत नाही. मात्र, जर स्त्रीने अशा प्रकारचं पाऊल उचललं तर त्याची मोठी चर्चा रंगते प्रसंगी संबंधित महिलेला बदनामीलाही सामोरं जावं लागतं. मात्र, महिलांकडून होणारा हा प्रकार चांगला की वाईट यावरही आता चर्चा सुरु व्हायला लागल्या आहेत. कारण, भारतात विवाहित महिलांच्या अफेअरच्या प्रमाणात वाढ झाल्याचा खुलासा एका सर्वेक्षणातून झाला आहे. 

‘ग्लिडन’ या फ्रेन्च एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅपद्वारे एक अभ्यास करण्यात आला या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ग्लिडन हा प्लॅटफॉर्म महिलांनी महिलांसाठी तयार केला आहे. खासकरुन ज्या महिला आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा त्यांचं लग्न झालेलं आहे अशा महिलांसाठी हे अॅप आहे. या अॅपचा प्रेम, सेक्स आणि मैत्री यासाठी मदत करणं हा उद्देश आहे. या अॅपचे भारतात सध्या १३ लाख युजर्स आहेत. 

भारतातील ३० ते ६० वयोगटातील शहरी महिलांचा अॅट्युटूड, त्यांचं शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित्व याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ४८ टक्के भारतीय महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये केवळ विवाहित महिलाच नव्हे तर मुलं झालेल्या महिलांचाही यात समावेश आहे. सर्वेक्षणातील ६४ टक्के महिला विवाहबाह्य संबंधामध्ये आहेत कारण त्यांना लैंगिक संबंधांमध्ये समाधान किंवा त्यांच्या पतीकडून त्यांना लैंगिक सुख मिळत नाही हे एक महत्वाचं कारण आहे. या सर्वेनुसार, ७६ टक्के महिला या विवाहबाह्य संबंधांसाठी इच्छुक आहेत यांपैकी बहुतेक या उच्चशिक्षित आहेत.  तर यांपैकी ७२ टक्के महिला या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. 
 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!