आरोग्यराष्ट्रीय

कोरोनाचा उद्रेक! २४ तासात आढळले २.६१ लाख संक्रमित रुग्ण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोरोनाने देशात अक्षरश: हाहाकार माजवला आहे. सलग चौथ्या दिवशी दोन लाखांहून जास्त कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. पहिल्या लाटेतही देशात इतके रुग्ण सापडले नव्हते. गेल्या २४ तासात भारतात तब्बल २ लाख ६१ हजार ५०० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृत्यू देखील मोठ्या संख्येने वाढला आहे. एका दिवसात देशात दीड हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पुन्हा एकदा देशात कोरोनाची चिंता अधिक वाढली आहे.

देशांत गेल्या २४ तासांत कोरोना बाधित रुग्ण संख्येने विक्रमी आकड्याची नोंद झाली असून २ लाख ६१ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी अक्षरश: धडकी भरवणारी आहे. तर देशात गेल्या २४ तासांत १ लाख ३८ हजार ४२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशांत आतापर्यंत १ कोटी ४७ लाख ८८ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या देशात १८ लाख १ हजार ३१६ ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत १ कोटी २८ लाख ९ हजार ६४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत १ लाख ७७ हजार १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १२ कोटी २६ लाख २२ हजार ५९० जणांनी लस घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!