देशात नवा शैक्षणिक पॅटर्न, १० वी १२ वी बोर्ड रद्द; केंद्र सरकारची नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला त्याच दिवशी दिल्लीत मोदी सरकारने बोर्डाच्या परीक्षेचं अस्तित्व बदलणारा निर्णय घेतला आहे. 10+2 अशी रचनाच आता नसेल केंद्र सरकारने आता देशात नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने आज बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले. त्याच बरोबर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नावही बलदण्यात आलं असून त्याला आता शिक्षण मंत्रालय (Ministry Of Education) असं म्हटलं जाणार आहे. 1992 नंतर पहिल्यांदाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे. या नव्या धोरणानुसार बोर्डाच्या परिक्षेचं महत्त्व कमी केलं आहे. त्यानुसार १० वी आणि १२ बोर्ड रद्द करण्यात आले आहे.
शिक्षण आणि विविध विषयांमधले तज्ज्ञ यांच्या समितीने अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. १९८६ मध्ये नवं शिक्षण धोरण तयार करण्यात आलं होतं. त्यात १९९२ मध्ये बदल करण्यात आला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात नवं शिक्षण धोरण तयार करण्याचं जाहीर केलं होतं.
असा आहे नवा पॅटर्न–
- आता गुणपत्रक नाही मुल्यांकनपत्र येणार
- मोदींच्या अध्यक्षतेखाली नवं धोरण मंजुर,
- बोर्डाच्या परिक्षेचं महत्त्व कमी केलं जाणार
- लेखी परिक्षांसोबत, प्रात्यक्षिक परिक्षाही होणार
- सर्व प्रकारच्या विद्यापीठांसाठी समान नियम
- शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेण्यावर भर दिला जाणार
- न्या धोरणानुसार १० वी , १२ वी बोर्ड रद्द
- १० +12 ऐवजी ५ + ३+ ३ +४ पॅटर्न होणार
- शुल्क आकारणीची रक्कम समान केली जाणार
- कॉलेजमधील प्रवेशासाठी प्रवेश परिक्षेला महत्त्व
- मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न
- र्व्हच्युएल लॅब उभारणार
#WATCH Live from Delhi – Cabinet briefing by Union Ministers Prakash Javadekar & Ramesh Pokhriyal. https://t.co/hgXYU79Mmy
— ANI (@ANI) July 29, 2020