११ वर्षाच्या मुलाने वडिलांचं अकाऊंट केलं हॅक, मागितली १० कोटींची खंडणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
आताच्या डिजिटल युगात हॅकिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून लहान मुलांमध्येही सोशल मीडियाबद्दल खूप आकर्षण आहे. पाचवीत शिकत असलेल्या ११ वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांनाच ईमेल करुन १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. १० कोटी नाही दिले तर अश्लील फोटो व्हायरल करेन अशी धमकीही देण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक असे की, उत्तर प्रदेशमधील ११ वर्षाच्या मुलाने युट्यूबवरुन हॅकिंग शिकून वडिलांकडूनच ईमेल करुन १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली वडिलांना आलेला खंडणीचा ईमेल एका हॅकर्स ग्रुपकडून पाठवला असल्याचे ईमेलमध्ये म्हटले होते. वडिलांचा ईमेल हॅक केला. ईमेल हँक केल्यानंतर त्यांचा पासवर्डही बदलला होता. १० कोटींची खंडणी नाही दिली तर अश्लील फोटो व्हायरल करेन अशीही धमकीही देण्यात आली धमकीचा मेल वाचून वडिलांनी तातडीने पोलिसात या घटनेची तक्रार केली. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपविण्यात आला हा मेल कोणी पाठवला, कुठून पाठविला याचा शोध पोलिस घेत असतांना आयपी एड्रेस त्यांच्या घरातील असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी खोलवर तपास करायला सुरुवात केली. पोलिसांना चौकशीदरम्यान घरातील मुलाचा संशय आला. पोलिसांनी मुलाची चौकशी केली त्यात मुलाने मीच हा ईमेल वडिलांना पाठविला असल्याचे कबूल केले.
पोलिसांनी मुलाच्या केलेल्या चौकशीतून समोर आले की, मुलगा ज्या ठिकाणी कॅम्प्युटर क्लासला जात होता तिथे हॅकिंग विषयी माहिती दिली होती, असे मुलाने सांगितले. हॅकिंगपासून कसे वाचायचे याविषयी क्लासमध्ये शिकवण्यात आले होते. मला त्याबद्दल उत्सुकता वाटली आणि म्हणून मी यूट्यूबर जाऊन हॅकिंग कसे करतात हे शिकलो, असे मुलाने सांगितले. मुलाने आधी युट्यूबवरुन हॅकिंग विषयी सर्व माहिती काढली, हॅकिंग कसे करायचे हे शिकला त्यानंतर त्याने त्याचा पहिला प्रयोग आपल्या वडिलांवरच करायचे ठरवले. मुलाने वडिलांचा ईमेल हॅक करुन त्यांना ईमेल पाठवला आणि १० कोटींच्या खंडणीची मागणी करुन अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. मात्र मुलाचा हा प्लॉन फसला आणि तो सायबर सेलच्या हाती लागला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.