भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

बाबरी विध्वंस पूर्वनियोजित नव्हता; सर्व ३२ आरोपी निर्दोष !

लखनऊ (वृत्तसंस्था)। बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. १ सप्टेंबर रोजी ही सुनावणी संपली आणि न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत निकालाचं वाचन राखून ठेवलं होतं. त्यात आज सर्व ३२ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

आज न्यायालयाने हे निकालांचं वाचन सुरू केलं. या खटल्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, साक्षी महाराज, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, जयप्रकाश गोयल, रामजी गुप्ता यांच्यासह एकूण ४८ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी १६ जणांचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाल्यामुळे आता एकूण ३२ आरोपींच्या शिक्षेचा फैसला घटनेच्या २७ वर्षांनंतर आज सुनावण्यात आला. यासाठी एकूण ३२१ साक्षीदार आणि ६०० कागदपत्रांचा समावेश करण्यात आला होता. यावर सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव तब्बल २ हजार पानांचं हे निकालपत्र आहे. लखनौच्या केसरबाग भागात असलेल्या उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीत ‘अयोध्या प्रकरण कोर्ट’ या नावाने हे विशेष न्यायालय काम करत होतं.

बाबरी मशीद पाडणं हा पूर्वनियोजित कट नव्हता, असं निरीक्षण या प्रकरणातील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कट असल्याचा आजपर्यंतचा दावा यामुळे निराधार ठरत आहे. न्यायालयानंं हे निरीक्षण नमूद केल्यामुळे या कलमाखाली केलेले आरोपही निराधार आहे.

बाबरी मशिद प्रकरणातील काही महत्त्वाची नावं-

लालकृष्ण अडवाणी
मुरली मनोहर जोशी
महंत नृत्य गोपाल दास
उमा भारती
साक्षी महाराज
कल्याण सिंह
सतीश प्रधान
विनय कटियार
साध्वी ऋतंभरा
जयप्रकाश गोयल
रामजी गुप्ता
चंपत राय बन्सल
राम विलास वेदांती
धर्मदास
संतोष दुबे
अमरनाथ गोयल
लल्लू सिंह
पवन पांडे
विष्णु हरी दालमिया
अशोक सिंघल
गिरीराज किशोरे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!