भयंकर! १८ वर्षीय तरूणीला किडनॅप करून वेगवेगळ्या राज्यात ७ वेळा विकलं आणि…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन। MTM Newsnetwork।
छत्तीसगडमधील एका अल्पवयीन मुलीची अवैधरित्या मध्य प्रदेशमध्ये तस्करी केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे पहिल्यांदा छत्तीसगड येथून अपहरण करण्यात आले होते आणि नंतर तिची विक्री करण्यात आली होती. २०२० या वर्षात वयवर्ष १८ असणाऱ्या पीडित मुलीची वेगवेगळ्या राज्यात ७ वेळा विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडितेने आत्महत्या केली. या प्रकरणात, मानवी तस्करीचे (Human Trafficking) रॅकेट चालविणाऱ्या जोडप्यासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
छत्तीसगडमधील आदिवासी बहुल छत्तीसगडमधील पीडित मुलीला मध्य प्रदेशातील एका जोडप्याने जुलै २०२० मध्ये छतरपूर येथे आणले होते, परंतु पीडित मुलीवर काही महिन्यांपूर्वी अत्याचार झाल्याने पीडितेने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पिडीत मुलीची अनेक वेळा विक्री देखील करण्यात आली. सर्वात पहिल्यांदा छतरपूर येथे राहणाऱ्या एका जोडप्याने तिचे अपहरण केले त्यानंतर तिच्या वडिलांकडून खंडणी मागितली, परंतु पैसे न मिळाल्याने २० हजार रुपयांवर मुलीची सौदा करण्यात आला. शेवटी, तिचा ७० हजार रुपयांमध्ये सौदा झाला आणि तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि यासर्व प्रकारानंतर तिने आत्महत्या केली.
छत्तीसगड पोलिसांना मदत करण्यासाठी एक विशेष पथक “अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आल्या नंतर हे मानवी तस्करीचे प्रकरण समोर आले. पोलिस पथकाने आरोपी संतोष कुशवाह यांच्या घरावर नजर ठेवली. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या ४५ वर्षीय रहिवाशांच्या चौकशीत मुलीला मुन्नाला विकल्याची माहिती समोर आली आणि नंतर पीडित मुलीला ७० हजार रुपयात विकत घेतल्यानंतर संतोष कुशवाहने त्याच्या मानसिक विक्षिप्त मुलगा बबलूशी लग्न लावून दिल्याची माहिती छतरपूरचे एसपी सचिन शर्मा यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्हा पोलिसांनी एका तरूण जोडप्याद्वारे चालवल्या गेलेल्या मानवी तस्करीच्या रॅकेटचं बिंग फोडलं. त्यांनी छत्तीसगडच्या १८ वर्षांची मुलगीच विक्रीच केली नाही तर तिच्या आई-वडिलांकडून पैशांची मागणी देखील केली होती. जुलै २०२० मध्ये मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात आलेल्या जोडप्याने पीडित मुलीला नोकरी मिळण्याच्या नावाखाली आणले होते, परंतु प्रत्यक्षात येथे आणल्यानंतर छतरपूर येथील कल्लू रायकवार या व्यक्तीला २०,००० रुपयांना विकल्याचे सांगण्यात आले.