भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईमराजकीयराष्ट्रीय

Breaking;चीनचे भारताविरुद्ध अघोषित युद्ध, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह 10 हजार जणांची हेरगिरी !

नवी दिल्ली: भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडलेले आहेत. लडाखमधील पाँगाँग त्सो परिसरात चिनी सैन्य घुसखोरीचे वारंवार प्रयत्न करत असल्याने वातावरण अगदीच स्फोटक बनलले आहे. त्यातच आता चीनचे भारताविरोधातील मोठे कारस्थान उघडकीस आले आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री: महाराष्ट्र – उद्धव ठाकरे, पंजाब-अमरिंदर सिंग, ओदिशा- नवीन पटनायक, पश्चिम बंगाल- ममता बॅनर्जी, राजस्थान- अशोक गेहलोत, मध्य प्रदेश -शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, पीयूष गोयल अशा देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून भारतीयांची चीन हेरगिरी करत असल्याचा दावा इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश शरद बोबडे, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते तसंच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर चीनस्थित एक मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवत आहे. चीनच्या आतापर्यंतच्या कायापालटात आणि ‘हायब्रीड वॉरफेर’मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ ही कंपनी हेरगिरी करत आहे. ही कंपनी चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात आहे. ही कंपनी महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांची हेरगिरी करत नसून अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांवरही नजर ठेवून आहे. राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यमं या यंत्रणांवरही ही कंपनी हेरगिरी करीत आहे. यासह भारतातील सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे.

संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह १५ माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्यावरही ही कंपनी नजर ठेवून आहे. उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह ‘भारत पे’ App चे संस्थापक निपुण मेहरा आणि ‘अर्थब्रिज’चे अजय त्रेहान आदी उद्योगपती हेरगिरीचे लक्ष्य आहेत. देशातील महत्त्वाच्या पदांवरील अधिकारीवर्ग, न्यायमूर्ती, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, पत्रकार, कलाकार, खेळाडू, आध्यात्मिक गुरू आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरही ‘झेनुआ’ कंपनीची नजर आहे. त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि अंमली पदार्थ, सोने किंवा वन्य प्राण्यांच्या तस्करीतील गुन्हेगारांच्या हालचालींवर कंपनीचं लक्ष्य आहे. विशेष म्हणजे ‘झेनुआ’ कंपनीने आपण चिनी गुप्तचर, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करीत असल्याचा दावा केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!