भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्यराष्ट्रीय

‘कोरोना मानवनिर्मित विषाणू; आपल्याकडे पुरावे आहेत’, चिनी वैज्ञानिक महिलेचा दावा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसची निर्मिती चीन देशांनी केल्याचे आरोप सर्वच देशांनी केले आहेत. मात्र, या आरोपात तथ्य नसून हा आरोप चीनने फेटाळत हा विषाणू नैसर्गिक असल्याचा दावा केला. मात्र, जगभर पसरणारा कोरोना विषाणू हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा दावा एका चिनी वैज्ञानिक महिलेने केला आहे. तसेच याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ.ली मेंग असे महिला विषाणूशास्त्रज्ञ महिलेचे नाव असून त्यांनी हा दावा केला आहे. तसेच त्यांनी हा दावा केल्यानंतर त्यांना चीन सरकारकडून धमक्या येत असल्याने त्या सध्या अमेरिकेत राहत आहेत. त्यांच्या य दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हायरस चीनने निर्माण केला असून मानवनिर्मित असल्याचे आपल्याकडे पुरावे असून आपण लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे चीन देशांनी जगापासून बरीच माहिती लपवून ठेवली आहे. हा व्हायरस चीननेच निर्माण केल्याचे आपण सिद्ध करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना व्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरला आहे. विशेष म्हणजे या व्हायरसची जीनोमची अंतर्गत रचना हाताच्या बोटांच्या ठशासारखी आहे. याच आधारावर आपण हा व्यवसाय मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करण्यार असल्याचे यान यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही व्हायरसची फिंगरप्रिंटसारखी रचना हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचे यान यांनी सांगितले आहे.

या व्हायरसबाबत आपल्याला माहिती मिळाल्याचे कळताच चीन सरकारकडून आपल्याला धमकवण्यात आले. त्यामुळे हॉंगकॉंग सोडून आपल्याला अमेरिकेत यावे लागले. त्यानंतर आपण जमवलेली सर्व माहिती आणि डेटाबेस चीन सरकारने नष्ट केला. तसेच आपल्या सहकाऱ्यांना माझ्याबाबत अफवा पसरवण्यास सांगण्यात आले, असा आरोपही यान यांनी केला आहे. चीनकडून आपल्याला खोटे ठरवण्यासाठी अनेकप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. आपल्यावर हत्या केल्याचे आरोपही ठेवण्यात येत आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपण मागे हटणार नाही. तसेच कोरोना व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या सुरुवातीच्या काही पथकांमध्ये आपण काम केले असल्याचेही यान यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्याला महत्त्व आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!