कोरोना चाचणी आता साडे तीनशे रुपयांत – WHO
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। कोरोना चाचणीचा दर २ ते ५ हजारांमध्ये असल्याने सर्वसामान्य नागरिकांना चाचणी करणे आर्थिकदृष्ट्या महाग पडत आहे. त्यामुळे अनेकांचा चाचणी करण्याकडे कल नसतो. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार आता फक्त साडे तीनशे रुपयांमध्ये चाचणी करता येणार आहे. या चाचणीमुळे ज्या देशांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या आणि प्रयोगशाळा कमी आहेत त्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले.
कोविड १९ चा रुग्ण शोधण्यासाठी करण्यात येणाऱ्या या चाचणीमुळे गरीब देशांना फायदा होणार आहे. या चाचणीमुळे या देशातील कोरोना रुग्ण शोधण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होईल. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १० लाखांच्या वर पोहोचली आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरणामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येमध्ये अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिकोमध्ये सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीमध्ये या नव्या चाचणीमुळे सर्वच देशांना दिलासा मिळणार आहे. तसेच कोरोना चाचणी करण्याची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले.