भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

कोणतीही लस ५० टक्केही प्रभावी नाही; WHO ने केले धक्कादायक विधान !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। जगभरासह कोरोनाचा कहर सुरू असताना त्याला आटोक्यात आणण्यासाठी जगातील कित्येक देश कोरोनावरील औषधं आणि लस तयार करण्यात प्रयत्नशील आहे. त्यामुळे साऱ्याचेच याकडे लक्ष लागले आहे. काही देशांच्या लस या तिसऱ्या टप्पात पोहचली आहे. तर, रशियाने जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस ‘स्पुटनिक व्ही’ विकसित केल्याचा दावा केला आहे. या दरम्यानच जागतिक आरोग्य संघटनेने लशींबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

सध्या चाचणी सुरू असलेल्या लशींपैकी एकही लस कोरोनावर ५० टक्केही प्रभावीही नसल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. यासह येत्या २०२१ पर्यंत जगातील सर्वच नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध होईल, याची खात्री नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अनेक लशी चाचणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मात्र, कोणतीही लस पूर्णपणे प्रभावी असल्याचे म्हणता येणार नाही. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे निकष या लसी पूर्ण करत नाहीत. त्यामुळे या लशी प्रभावी आहेत असे म्हणता येणार नाही. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातही व्यापक स्वरूपातील लसीकरण मोहीम सुरू होईल,असे वाटत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरीस यांनी जिनिव्हामध्ये सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रुयसुस यांनी सांगितले की, लसींचा वापर यशस्वीपणे अनेक दशकांपासून केला जात आहे. पोलिओ निमुर्लनात लसींचा वापर महत्त्वाचा ठरला आहे. जी लस सुरक्षित आणि प्रभावी नसेल त्या लशीची शिफारस करणार नाही असेही त्यांनी सांगितले. तर कोरोनाला अटकाव करणारी लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याशिवाय जागतिक आरोग्य संघटना या लशीच्या वापराची शिफारस करणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!