भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमराष्ट्रीय

शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा होता कट; शूटरचा दावा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी शेतकरी आंदोलकांनी एका संशयित व्यक्तीला प्रसार माध्यमांसमोर हजर केलं. २३ ते २६ जानेवारी दरम्यान चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यासाठी सुपारी मिळाली होती, असा दावा या शूटरने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक पोलीस अधिकारी प्रदिप सिंग यांनी ही सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप शूटरने केला आहे. गोळीबार करुन वातावरण बिघडवण्याचा डाव होता, असा खुलासा त्याने केला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यावर ठाम आहेत. हा कायदा स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. आता अडथळा आणण्यासाठी कट रचल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सिंघू सीमेवरुन शेतकऱ्यांनी संशयिताला पकडलं आहे. सिंघू सीमेवरील शेतकर्‍यांनी पकडलेल्या संशयिताने सोनीपतमधील राय पोलिस स्टेशनचे अधिकारी प्रदिप सिंग यांचं नाव घेतलं आहे. प्रदिप सिंग यांनी २६ जानेवारीला चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट रचला असल्याचं संशयिताने सांगितलं. अधिकाऱ्याने त्या चार नेत्यांचे चित्रही शेअर केले आहेत.

आंदलोन करणार्‍या शेतकर्‍यांनी शस्त्रे बाळगली आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी दोन पथके गठित केल्याचा संशयिताने खुलासा केला आहे. ते स्वतः १९ जानेवारीपासून सिंघू सीमेवर आहेत. २६ जानेवारी रोजी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये सामील होण्याची त्यांची योजना होती. आंदोलक परेडसह बाहेर गेले तर आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती संशयिताने दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!