भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

Covid-19: कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले, १.१५ लाख नव्या रुग्णांची नोंद !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली: वृत्तसंस्था। देशभरातील कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही, कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाने आज देशातील आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या २४ तासांत १ लाख १५ हजार ७३६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६३० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५९ हजार ८५६ रिकव्हर होऊन घरी गेले आहे. देशातील आता कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २८ लाख १ हजार ७८५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६६ हजार १७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्या ८ लाख ४३ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे. ६ एप्रिलपर्यंत २५ कोटी १४ लाख ३९ हजार ५९८ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी काल दिवसभरात १२ लाख ८ हजार ३२९ जणांच्या चाचण्या झाल्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात ५ हजार ४६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख १३ हजार ३५४ झाली असून ४ लाख ७२ हजार २८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राज्यामध्ये मागील २४ तासांमध्ये २९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांची संख्या ५६ हजार ३३० वर पोहोचली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!