कोरोनाचा कहर! एका दिवसातील रूग्णांची सर्वाधिक नवीन आकडेवारीची नोंद !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली:वृत्तसंस्था। देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.भारतात कोरोना संक्रमणानं आणखीन एक रेकॉर्ड गाठलाय. भारतात एका दिवसात ६२ हजार २५८ रुग्ण समोर आले आहे. देशातील ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. गेल्या २४ तासांत देशात ६२ हजारहून अधिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. तर ३० हजारहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या २४ तासांत २९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशांत गेल्या २४ तासांत ६२ हजार २५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३० हजार ३८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या देशात १ कोटी १९ लाख ८ हजार ९१० कोरोना रुग्ण आहेत. तर १ कोटी १२ लाख ९२ हजार २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४ लाख ५२ हजार ६४७ Active रुग्ण असून आतापर्यंत १ लाख ६१ हजार २४० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
राज्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी सुरूवातीपासूनच करोना संक्रमणाच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३६ हजार ९०२ रुग्ण आढळले आहेत.गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ११२,, पंजाबमध्ये ५९, छत्तीसगडमध्ये २२, केरळमध्ये १४ आणि कर्नाटकात १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.