दिल्ली स्फोटाची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ संघटनेन स्वीकारली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन। नवी दिल्ली,वृत्तसंस्था
दिल्लीतील इस्त्राईल दूतावास परिसरात शुक्रवारी बॉम्बस्फोटाने हादरले होते. या घटनेचा तपास सुरु झाला असून या तपासादरम्यान एक नवी माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ या संघटनेनं घेतली आहे.
सोशल मिडियातून याप्रकारची माहिती समोर येत आहे. मात्र तपास यंत्रणांकडून या सोशल मिडिया मॅसेजची तपासणी केली जात आहे. सोशल मिडिया चॅटमधून ही माहिती समोर आल्याचे बोलले जात आहे. याआधीही एक चिठ्ठी यंत्रणांना घटनास्थळी सापडली होती. यात हा फक्त ट्रेलर होता असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे यातून दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळाले होते. या मॅसेजमध्ये दहशतवादी संघटना हल्ल्यावर अभिमान व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, यंत्रणांकडून ‘जैश उल हिंद’कडून करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केली जात आहे. या परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. यातील एका फुटेजमध्ये एका कॅबमधून दोन लोक घटनास्थळी उतरले. त्यानंतर ही कॅब तेथून निघून गेली. त्यानंतर कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथून पायी जाताना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत, या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे स्पेशल सेलने कॅब चालकाचा शोध घेत त्याच्याशी संपर्क केला. कॅब चालकाच्या माध्यामातून आता दोन्ही व्यक्तीचे चित्र रेखाटले जात आहे.
बॉम्बस्फोट झाला त्याठिकाणी पोलिसांना तपासासाठी बरेचं साहित्य मिळाल आहे. या साहित्यामध्ये एक लिफाफाही सापडला आहे. लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चिठ्ठीत इराण लष्कर कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावाचा शहीद असा उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांचीही गेल्या वर्षी हत्या झाली होती. बगदाद विमानतळाजवळ ड्रोन हल्ल्यात या दोघांची हत्या झाली. अशाप्रकारचे धमकीवजा मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने देशांतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याच आली आहे. मुंबईत देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राजधानी दिल्लीतला सर्वाधिक सुरक्षित मानला जाणारा ल्युटन्स झोन शुक्रवारी संध्याकाळी या बाँब स्फोटाने हादरला. या स्फोटात जीवितहानी झालेली नसली, तरी विजय चौकाजवळ झालेल्या स्फोटाने राजधानी हादरली आहे. देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांतली सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.