भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

चीनमध्ये आणखी नव्या व्हायरसचा कहर ! ७ जणांचा बळी, ६० पेक्षा अधिक जणं संक्रमित !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। चीनच्या वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. मात्र या कोरोना विषाणूनंतर आता चीनमध्ये एक नवीन विषाणूचा फैलाव होत आहे. यामुळे चीनमध्ये आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला असून ६० पेक्षा अधिक लोक आजारी आहेत. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, पूर्व चीनच्या जियांगशू आणि अनहुई प्रांतात बरेच लोक आजारी पडले आहेत. हा विषाणू एखाद्या कीड्याने चावा घेतल्यास पसरतो.

या विषाणूमुळे जियांगशूमध्ये ३७ आणि अनहुईमध्ये २३ लोक आजारी आहेत. दोन्ही राज्यात या नवीन विषाणूमुळे आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचे नाव हुईयांगशान बनयांगव्हायरस (Huaiyangshan banyangvirus) असे असल्याचे सांगितले जात आहे. आजतकने दिलेल्या माहितीनुसार याला सामान्य भाषेत (SFTS) व्हायरस देखील म्हणतात. डॉक्टरांनी असे सांगितले की, हा विषाणू मानवांमध्ये किड्याच्या चाव्याने प्रवेश करतो. वैज्ञानिकांनी या व्हायरसला बुन्या व्हायरस प्रकारात असल्याचे सांगितले तर इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीला जर याची लागण झाली तर दुसरा व्यक्ती देखील यामुळे आजारी पडू शकतो. तसेच झिजियांग युनिव्हर्सिटीचे डॉक्टर शेंग जिफांग म्हणाले की, हा एसएफटीएस विषाणू मानवाच्या माध्यामातून इतर मानवांमध्ये पसरू शकतो. चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हा आजार माणसांमार्फत माणसांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्याबाबत लोकांना सावध करण्यात आलं आहे ही भीती नाकारू शकत नाही. हे रुग्णाच्या पेशीद्वारे किंवा रक्ताद्वारे निरोगी व्यक्तीमध्ये पसरू शकते. डॉक्टरांनी असा इशारा दिला आहे की, या धोकादायक विषाणूचा संसर्ग किड्या चाव्याव्दारे वेगाने पसरत आहे. सध्या याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. चीन व्यतिरिक्त हा विषाणू जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि तैवानमध्येही आढळला आहे. या विषाणूचे प्रमाण १२ टक्के आहे. काही ठिकाणी ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या विषाणूमुळे आजारी पडलेल्या लोकांना तीव्र ताप, उलट्या, अतिसार, अवयव निकामी होणे, रक्तपेशी कमी होणे, पांढर्‍या पेशींचे प्रमाण कमी होणं आणि यकृत एंजाइमसारखे लक्षण आढळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!