भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

खुशखबर! संपूर्ण देशात मोफत मिळणार लस – केंद्रीय आरोग्यमंत्री

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना संदर्भात सरकार देशवासियांना दिलासा देणारे निर्णय घेत आहे. शुक्रवारी पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट आणि ऑक्सफर्डमार्फत तयार करण्यात आलेल्या कोविशिल्डला लसीला पहिल्या टप्प्यातील परवानगी मिळाली आहे. तसेच आजपासून देशभरात लसीकरणाच्या ड्राय रनला देखील सुरुवात झाली आहे. आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. आता दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार असल्याचं हर्षवर्धन यांनी जाहीर केलं आहे.

देशभरातील सर्व भारतीयांना कोरोना लस मोफत दिली जाईल अशी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी ड्राय रन सुरू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात जाऊन याबाबत आढावा देखील घेतला आहे. त्यादरम्यान हर्षवर्धन यांनी ही घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!