हाताला सॅनिटाझर लावून सोनं लुटणाऱ्या त्या गँगचा पोलिसांकडून एन्काऊंटर!
मुंबई (वृत्तसंस्था)। काही दिवसांपूर्वी एका ज्वेलरी शॉपमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक ज्वेलरी शॉपमध्ये चोर शिरतात. ग्राहक समजून दुकानाचा मालक त्यांच्या हाताला सॅनिटाझर देखील लावतो. पण ग्रहाकनसून दरोडे खोर असतात हे त्यांच्या लगेचच नंतर लक्षात येतं. कारण हे दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोनं लुटतात. या तिघांनाही पोलिसांनी पकडलं आहे. या तिघांचा पोलिसांनी एन्काउंटर केला. या तिघही जखमी झाले.
या तिघांवरही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यांच्याजवळून लाखो रूपयांचे दागिने, बेकायदेशीर दारू, आणि अनेक बाईक जप्त करण्यात आल्या. हे तेच दरोडेखोर आहेत ज्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हाताला सॅनिटाझर लावून सोनं लुटणाऱ्या या गँगची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. ११ सप्टेंबरला अशाच तीन घटना घडल्या. त्यानंतर यूपी पोलिसांनी या तिघांचा शोध सुरू केला. बुधवारी लुटलेले दागिने घेऊन हे तिघे नोएडा येथे विक्रीसाठी आले होते. त्यानंतर पोलिसांना त्यांची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. ओखला बॅरेज दिल्ली सीमेवर पोलिसांनी तपासणी सुरू असता. यावेळी हे तिघे मोटकसायकलवर दिसले. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. यावेळी त्यांनी अचानक गोळीबार केला. त्यांनंतर पोलिसांनी गोळीबार केला. ज्यात तिन्ही दरोडेखोरांच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी तिघांना पकडले तिघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सीपी लव कुमार यांनी सांगितले की, तपासणी दरम्यान तिघांनीही थांबण्याचा इशारा देण्यात आला होता. पण ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना चौकीजवळ घेरले. त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यांच्याकडील दुचाकी, तपकिरी, लुटेरे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आता त्यांच्या आणखी गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.