भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

रशियाच्या कोरोना लसीबाबत सत्य समोर !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जगातील कोरोना वरील पहिली लस विकसित झाल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी ही लस त्यांच्या मुलीलाही देण्यात आल्याचे पुतिन म्हणाले होते. पण या रशियाच्या लसीबाबत काही माहिती समोर आली आहे. या कोरोना लसीची फक्त ३८ लोकांवर चाचणी नंतर लसीला मंजूरी देण्यात आली आहे, असा खुलासा रशियाच्या अधिकृत दस्तऐवजांचा हवाला देत डेली मेल रिपोर्टमध्ये केला आहे.

वेदना होणे, सूज येणे, जास्त ताप येणे, असे साइड इफेक्ट्स झाले आहे. त्याचबरोबर कमकुवतपणा येणे, एनर्जी कमी होणे, भूक न लागणे, डोकेदुखी होणे, अतिसार, नाक बंद होणे, घसा खराब होणे आणि नाक वाहणे असे साइड इफेक्ट्स जाणवले आहेत असे, फोंटंका (Fontanka) न्यूज एजन्सीने म्हटले आहेत. लसीचे साइड इफेक्ट्स अनेक असून हे व्यक्तीच्या शरीरात पुन्हा होऊ शकतात व बऱ्याच काळासाठी राहतात. या लसीचे साइड इफेक्ट्स जास्तीत जास्त स्वतः बरे झाले आहेत. परंतु ४२ व्या दिवशी साइड इफेक्ट्सच्या ३१ घटना झाल्या आहेत. लस दिल्यानंतर ४२ व्या दिवशी व्हॅटिलेंटवर असलेल्या शरिरात अँटीबॉडीजचे प्रमाण कमी होत होते, असा या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पुतिन म्हणाले होते की, ‘मुलीला लस दिल्यानंतर काही काळासाठी ताप आला होता.’ दरम्यान रशियाने १८ वर्षांच्या कमी वयाच्या आणि ६० वर्षांच्या जास्त वयाच्या लोकांना लस देण्यासाठी परवानगी दिली नाही आहे. कारण अशा लोकांवर काय परिणाम होईल याची माहिती नाही आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांना फक्त ४२ दिवस रिसर्चनंतर लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे ही लस किती प्रभाव आहे हे कळू शकले नाही, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रशियाने आपल्या कोरोना लसीचे नाव Sputnik V असे ठेवले आणि अनेक देशांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आणखी तयार देखील करत आहे. शास्त्रज्ञांनी ही भीती व्यक्त केली आहे की, ही लस चुकीची किंवा धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यास महामारी एक भयानक रुप धारण करू शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!